मातीचा धुंद करणारा सुगंध ... हिरवीगार झालेलीवृक्षवल्ली ... वातावरणात आलेला उत्साह ... पाऊसहळूहळू मनाचा ताबा घेऊ लागतो आणि मग जिभेवरताबा ठेवणं कठीण जातं . गरमागरम , रुचकर पदार्थांचीसाथसंगत अनिवार्य होऊन बसते . भजी , वडे खुणावूलागतात आणि पक्क्या मुंबईकरांच्या नाकाला यास्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असणारे नाके आकर्षित करूलागतात . त्यातही पाऊस आणि भजी यांचं नातं खासच. पाऊस आणि कविता किंवा पाऊस आणि प्रेमयांच्यासारखंच . पहिल्या पावसाचा आनंद घेता घेतागरमागरम भज्यांची चव चाखण्याची संधी मग कुणीहीसोडू शकत नाही .
मुंबईत असे भजीचे स्पॉट असंख्य आहेत . कांदा भजी ,बटाटा भजी , मेथी भजी , मूग भजी , पालक भजी , मिरचीची भजी अशा प्रकारांबरोबर आता चायनिजभजीसारखे वेगळ्या चवीची ओळख करून देणारे प्रकारही लोकप्रिय होताना दिसतात . त्यासोबत येणाऱ्याचटण्याही जिभेचे चोचले पुरवतात . नाक्यानाक्यावर मिळणाऱ्या या भज्यांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बनवलीजात नसली तरी नॉनव्हेज भजीही पावसाळ्यात लज्जत आणतात . त्यात खिमा भजी व जवळा भजी यांनाविशेष मागणी असते .
कांदा भजी हा पावसाळ्यातला सर्वात लोकप्रिय प्रकार . बाहेर या भजीचा आस्वाद घेतानाच घरीही कुटुंबासोबतया भजीची चव चाखण्याची मजाही वेगळीच . खोबरे - लसणाच्या चटणीबरोबरच कोथिंबिरीच्या आंबटगोडचटणीसोबतही या भजीची मजा घेता येते . बारिक उभा चिरलेला कांदा घेऊन त्यात मीठ आणि ओवा टाकूनथोडा वेळ ठेवा . या कांद्याला पाणी सुटेल आणि मग त्यात बेसन पीठ , लाल तिखट , हळद , चवीप्रमाणे मीठ ,कुरकुरीतपणासाठी तांदळाचं पीठ असं मिश्रण करून त्यात कांदा मिसळा व घट्ट मिश्रणाचे गोळे गरम तेलात तळा. चला , पाऊस वाढू लागला आहे .
आता भजीचा आनंद घ्यायलाच हवा .
पार्ल्यातील वसंत नामे यांच्या पार्लेश्वर वडापाव सम्राट या प्रसिद्ध दुकानातील चायनिज भजी म्हणजे तरुणांचावीक आणि विक पॉइंटही आहे . कोबी , गाजर , फरसबी , भोपळी मिरची अशा भाज्यांपासून बनविण्यातआलेली व्हेज चायनिज भजी म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा विषय . गेली २७ वर्षे या क्षेत्रात आपली एक वेगळीओळख निर्माण करणाऱ्या नामे यांच्या पार्लेश्वर मंदिराजवळ असलेल्या दुकानात या भजीचा आस्वाद घेण्यासाठीलोकांची झुंबड उडते . वडापाव हे त्यांचे अस्सल उत्पादन . पण आज तरुणाईच्या जिभेवर चायनिजची चवरुळत असताना नामे यांनी त्याच चवीची भजी तयार केली आणि शेजवान चटणीसह या भज्यांचा आस्वादघेणारी पिढी तयार झाली . आज कॉलेज तरुण तरुणींच्या या भजीवर उड्या पडतात ते उगीच नव्हे . चायनीजभजी नेमकी कशी बनवतात , याचे वर्णन नामे करतात तेव्हाच तोंडाला पाणी सुटू लागते . कोबी , फरसबी ,गाजर , भोपळी मिरची किसून त्यात आले , मिरची , लसूण यांची पेस्ट टाका . लाल भोपळी मिरची मिक्सरलालावून तीही या मिश्रणात टाकली की , भजीला लाल रंगही येईल . सोबत टॉमेटो सॉस , चिली सॉस आणिचवीनुसार मीठ टाकले की , झाले भजीचे मिश्रण तयार . घट्ट मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून मग तेलात तळा .नंतर शेजवान चटणीसोबत भजीचा आस्वाद घ्या . नामे भजीची कृती सांगतात . आज तर पार्ल्यातीलच नव्हे तरअख्ख्या मुंबईतून नामे यांच्या दुकानांतील या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होते . त्यात सेलिब्रिटीहीअसतात . परदेशातही त्यांचे हे पदार्थ पाठविले जातात . सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांना सुखावणारे हे खरेनामेवंत म्हणायला हवेत .
दादर , शिवाजी पार्क येथील रवी आणि बाबू वसईकरांची बटाटाभजीही अशीच लोकप्रिय . बटाट्याचे पातळकाप घ्यावेत . त्यानंतर बेसन पीठ , चवीपुरते मीठ , हळद , कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं थोडं पीठ आणिबारीक केलेला थोडा ओवा असं मिश्रण घ्यावं आणि त्यांच्या मिश्रणात हे काप टाकून ते नंतर तळावेत , बाबूवसईकर आपली खासियत असलेल्या बटाटा भजीच्या रेसिपीविषयी सांगतात . १९६८पासून सुरू असलेलात्यांचा हा व्यवसाय आता व्यवसाय न राहता सवयच बनली आहे . अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीही त्यांच्याया भज्यांची आणि वड्यांची चव एकेकाळी आजमावली होती . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही येथे भेटदिलेली आहे . कांदाभजी मात्र ते बनवत नाहीत . खरे तर धंदा करायचा म्हणून कांदाभजी बनवून लोकांनाउगीचच बनविणे त्यांना पसंत नसावे . पार्ल्यातील नामे , बाबू वसईकर यांच्याप्रमाणेच वांद्रे गव्हर्नमेंटकॉलनीतील पाटील , प्रभादेवीचे सारंग हेदेखील अशा चवदार भजी व वड्यांसाठी नावाजलेले आहेत . मग आताया पावसात या स्पॉटना भेट द्या आणि पावसाचा आनंद लुटा !
महेश विचारे
No comments:
Post a Comment